कोणत्या टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क चांगले, यासंदर्भात ट्रायने नुकतीच इंडिपेंडेंट ड्राइव्ह टेस्ट (आयडीटी) घेतली. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 दरम्यान नवी दिल्ली, जयपूर, अहिल्यानगर आणि हैदराबाद येथे ही चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीने निष्कर्ष ट्रायने नुकतेच जाहीर केले.
बीएसएनएल/एमटीएनएल, रिलायन्स जिओ इन्पह्कॉम लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांवर ही चाचणी घेण्यात आली. चाचणीने व्हॉइस कॉल सेटअप यश दर, कॉल ड्रॉप दर, भाषण गुणवत्ता, डेटा थ्रुपुट आणि इतर कामगिरी निर्देशांकांचे मूल्यांकन केले.
नवी दिल्ली ः रिलायन्स जिओने कॉल सेटअप सक्सेस रेट 94 टक्के नोंदवला, तर एअरटेल, एमटीएनएल आणि व्होडाफोन- आयडियाने 97 टक्के पेक्षा जास्त दर नोंदविला. कॉल सेटअप वेळेत एमटीएनएलने 3.27 सेपंद घेतले, तर रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अनुक्रमे 0.73 सेपंद आणि 0.82 सेपंद वेळ घेतला. कॉल ड्रॉप रेटमध्ये एमटीएनएलची कामगिरी खराब (7.23 टक्के) होती, तर रिलायन्स जिओ सह इतर कंपन्यांचे दर 0.25 टक्के पेक्षा कमी होता. रिलायन्स जिओने 231.82एमबीपीएसच्या सरासरी डाउनलोड स्पीडसह सर्वोत्तम कामगिरी केली, तर एअरटेलचा स्पीड 171.44 एमबीपीएस होता. एमटीएनएल, व्होडाफोन – आयडीयाचा वेग अनुक्रमे 3.71एमबीपीएस, 14.45 एमबीपीएस होता.
हैदराबाद
रिलायन्स जिओ आणि एअरटेलसाठी कॉल ड्रॉप रेट शून्य इतका होता, तर बीएसएनएलचा दर 3.76 टक्के होता. रिलायन्स जिओने हैदराबादमध्ये 100 टक्के कॉल सेटअप सक्सेस रेट मिळवला, तर एअरटेल आणि बीएसएनएलचा दर 99.85 टक्के आणि 98.92 टक्के होता.
जयपूर
रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाने 100 टक्के कॉल सेटअप यश दर नोंदविला, तर एअरटेल आणि बीएसएनएलने 99.90 टक्के आणि 98.92 टक्के यश दर मिळविला. बीएसएनएलसाठी कॉल ड्रॉपचा दर 2.48 टक्के होता, तर रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियासाठी हा दर खूपच कमी होता. रिलायन्स जिओने 356.68 एमबीपीएसच्या सरासरी डाउनलोड स्पीडसह सर्वोत्तम कामगिरी केल़ी