दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. भारतीय न्याय संहिता पोलीस या कायद्याविषयी दिंडोशी न्यायालयातील अभियोक्ता उषा जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस जनसंपर्क अधिकारी विवेक सोनावणे उपस्थित होते. मुंबई पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-12 अंतर्गत दहिसर पोलीस ठाणे यांनी अभियोक्ता उषा जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
दरम्यान, मारहाण, विकासकांकडून होणारी फसवणूक, लहान मुलांचा मानसिक व शारीरिक छळ, ज्येष्ठ नागरिकांवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी काय करावे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. हा उपक्रम राबवणारे पोलीस निरीक्षक जनसंपर्क अधिकारी विवेक सोनावणे, गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक अशोक नाना घुगे तसेच सायबर क्राईम प्रतिबंधक विभाग उपपोलीस निरीक्षक अंकुश दाडंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.