ट्रेसिबिलिटी नियम आणण्याची तयारी पूर्ण; फेक कॉल, मेसेज बंदसाठी ट्रायची पुन्हा मुदतवाढ

टेलिकॉम कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी ट्रायने शेवटची संधी देत 11 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. नवा नियम लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या आणि इतर संस्थांच्या तयारीअभावी तो अनेकवेळा पुढे ढकलला. आता त्याच्या अंमलबजावणीसाठी 11 डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे. ट्रायने टेलिमार्केटर्स आणि इतर संस्थांना लवकरात लवकर आपली प्रणाली अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्रायच्या सूचनेनुसार, बनावट एसएमएस आणि कॉल बंद करावे लागतील, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये मेसेज ट्रेसिबिलिटी नियम आणण्याची घोषणा केली होती.