
राज्यभरात होळीचा सण साजरा होत असतानाच बदलापूरमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. येथे होळी खेळण्यासाठी गेलेले चार अल्पवयीन मुलं उल्हास नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. होळी खेळल्यानंतर रंग काढायला नदीत गेले असता ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चारही मुलं चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. ही मुलं धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अदांज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.