
लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली हे. येथे खेळताना विहिरीत पडून तीन वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या सहा वर्षांच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लातूर शहरातील तालेबुऱ्हाण भागात ही घटना घडली. अलिना समीर शेख (वय 6) वर्ष आणि उस्मान समीर शेख (वय 3) असे मृत मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं घराजवळ खेळत होती. ते खेळत असलेल्या भागात एक विहीर आहे. या विहिरीला सरक्षण भिंत नसल्याने व काठाचा भाग निसरडा असल्याने खेळता खेळता दोघे मुलं पाय घसरून विहिरीत पडले. सोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी याची माहिती मुलांच्या कुटुंबियांना दिली. मुलांच्या कुटुंबीयांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेत दोन्ही चिमुकल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र विहीर पाण्याने भरलेली असल्याने यामध्ये तास दीड तास गेला. यातच दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.