
दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्याला ठाऊक आहे की, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून दंड म्हणून चलन कापले जाते. अलीकडच्या काळात दिल्लीत तीन वाहनांनी जणू चलन कापण्याचा रेकॉर्ड केलाय. या तीन वाहनांची थोडीथोडकी नव्हे तर एकूण दोन हजार चलन कापल्याची गंभीर बाब समोर आलेय. फरिदाबाद येथील एका खासगी गाडीवर 855 वेळा, तर दुसऱ्या गाडीवर 637 तर तिसऱ्या एका मालवाहक वाहनाच्या नावावर 596 वेळा चलन कापले गेले आहे. म्हणजे या तीनही वाहनांनी मोठय़ा प्रमाणात वाहतूक नियमांची ऐशी की तैशी केल्याचे दिसून येतंय.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी बेपर्वाने वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलेला असताना हे आकडे समोर आले आहेत. स्पॉट चेकाRगमध्ये किंवा सर्विलान्स पॅमेरातून अशा घटना पकडण्यात आल्या आहेत. फरिदाबाद येथील वाहनाने तर 807 वेळा वेगमर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे, तर 43 वेळा लाल सिग्नल तोडलाय. 4 वेळा स्टॉप लाईनचे उल्लंघन, तर एकदा पार्किंगचा नियम मोडलेला आहे. उर्वरित दोन्ही वाहनांनीही अनुक्रमे 565 आणि 590 वेळा वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल चलन फाडले आहे. दिल्लीचे अतिरिक्त आयुक्त ( वाहतूक ) सत्य वीर कटारा यांनी कडक कारवाईचा आणि प्रभावीपणे दंड आकारणीचा इशारा दिला आहे.