वाहतूक पोलिसांचा मद्यपींना दणका, दोन दिवसांत 22 मद्यपी चालकांविरोधात गुन्हा

दारू ढोसून बेदरकारपणे गाडय़ा चालविणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. दोन दिवसांत 22 मद्यपी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांचा परवाना रद्द अथवा निलंबित करण्यात येणार आहे. दारूच्या नशेत तर्रर होऊन निष्काळजीपणे गाडी चालविणाऱया विरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. दोन दिवसांत पोलिसांनी 22 मद्यपी चालकांना पकडले. या सर्वांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व चालकांचा चालक परवाना रद्द अथवा निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.