श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 6 जुलैला सातारा जिह्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी लोणंदसह परिसरातील वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिह्यात यंदा 6 ते 11 जुलै या कालावधीत पालखीसोहळा असणार आहे. हा पालखीसोहळा नीरा-लोणंद-फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार आहे. या सोहळयात लाखो भाविक सहभागी होत असल्याने कोणताही अपघात होऊ नये व वाहतूक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये 6 ते 9 जुलै या कालावधीत फलटण येथून पुणे, नीरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंका काठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगांव घाटातून कळवण्यात आली आहे. 5 ते दि. 8 जुलै या कालाकधीत आदर्वी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात आली आहे.
दि. 5 ते 10 जुलै या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे जाणारी काहतूक आदर्वीमार्गे फलटणकडे वळवण्यात आली आहे. तसेच दि. 5 ते 9 जुलैदरम्यान फलटण ते लोणंद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दि. 9 ते 11 जुलै या कालावधीत फलटण ते नातेपुतेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज येथून बारामतीमार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.
नातेपुतेकडून फलटणमार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहीकडी-सातारा अशी वळवण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दहीगाव-जांब-बारामतीमार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. नातेपुते-काई-काठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिवाटणे-शिंगणापूर – जाकली-कोळकी-झिरपकाडी-किंचुर्णी-ढवळपाटी – काठार फाटामार्गे वळवण्यात आली आहे.
दि. 10 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून बरड मुक्कामी सकाळी 6 वाजता मार्गस्थ होणार आहे. यावेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण – दहीकडी चौक-कोळकी, शिंगणापूर तिवाटणे-वडले -पिंप्रद-बरड अशी वळवण्यात आली आहे.
खंबाटकी घाटातील कामामुळे वेळे येथून वाहतुकीत बदल
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खंबाटकी बोगद्याचे काम सुरू आहे. हे काम वेळे येथे आले आहे. कामासाठी महामार्ग खोदकाम करण्यात येणार असल्याने वेळे येथे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीतील हा बदल कायम असणार आहे. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी आदेश काढला आहे.
पुणे ते सातारा जाणारी वाहतूक वेळे येथील हॉटेल आरामच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील सर्व्हिस रोडने वळवून पुढे साताऱ्याकडे वळवली आहे. सातारा ते पुणे बाजूकडे जाणारी काहतूक हॉटेल आराम समोरून पुणे ते सातारा लेनने वळवून पुढे छत्रपती शिकाजी महाराज पुतळ्यासमोरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावरून जुना बोगदामार्गे पुणेकडे वळवण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून वाहतूक वळवण्यात आली आहे, तेथे सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.