Pune News : झिकाचे टेन्शन! रुग्णसंख्या 11 वर, पाच गर्भवती महिलांचा समावेश

पुण्यात झिका विष्णुचा संसर्ग वेगाने वाढत असून आज कर्वेनगर आणि खराडी परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण झिका बाधित रुग्णाची संख्या 11 वर पोहोचली आहे. यामध्ये पाच गर्भवती महिलांचा समावेश आहे. शहरातील विविध भागामध्ये झिका विष्णुचा संसर्ग सिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये या विष्णुचा आणखी धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरात झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला एरंडवणे परिसरात दोन झिका बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मुंढवा, कोथरूड भागातील डहाणूकर कॉलनी, पाषाण आणि आंबेगाव बुद्रुकमध्ये झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आता कर्वेनगर आणि खराडी परिसरातही दोन जणांना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कर्वेनगरमधील एका खासगी रुग्णालयात काम करणाया 42 वर्षीय महिलेला झिकाची बाधा झाली आहे. तिला एक ते दोन आठवडय़ांपासून ताप येत होता. त्यामुळे रुग्णालयाने तिच्या रक्त आणि लघवीचे नमुना तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले होते. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर खराडी भागातील 22 वर्षीय तरुणाचाही अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणांमध्ये ताप आणि अंगावर लाल पुरळ यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.