
30 मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘सिकंदर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालत नाही. चित्रपटाचे देशभरातील एकूण कलेक्शन फक्त 97.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाचे बजेट 200 कोटी रुपयांचे आहे. ते निघणे कठीण दिसत आहे. चित्रपटाच्या निर्मिती कंपनी साजिद नाडियाडवाला आणि ग्रॅण्डसनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जगभरात 178.16 कोटी रुपये कमावले असल्याचा दावा करण्यात आला आहे.