
नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मार्च महिना खूप चांगला ठरू शकतो. रॉयल एनफील्डपासून ते टीव्हीएस मोटरपर्यंत दुचाकी उत्पादक कंपनी आपली नवीन बाईक लॉन्च करण्याची तयारी करत आहे. दुचाकी कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहेत. अशातच जर तुम्हीही नवीन पॉवरफुल बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास ठरू शकतो. या महिन्यात तीन जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहेत. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…
Royal Enfield Classic 650
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गेल्या वर्षी EICMA 2024 मध्ये सादर करण्यात आली होती. या बाईकची डिझाइन क्लासिक 350 सारखी असू शकते. इतर 650 सीसी रॉयल एनफील्ड बाईकप्रमाणे, यात 647.95 सीसी, एअर आणि ऑइल-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन दिसू शकते. जे 470.6 पीएसची पॉवर आणि 52.3 एनएम टॉर्क देईल. ही बाईक चार वेगवेगळ्या ड्युअल-टोन पेंट स्कीममध्ये उपलब्ध होऊ शकते. डिझाइनच्या बाबतीत ग्राहकांना ही बाईक आवडू शकते.
TVS Apache RTX 300
टीव्हीएस मोटर कंपनी मार्च महिन्यात देशात आपली पहिली ॲडव्हेंचर बाईक लॉन्च करू शकते, ज्याचे नाव टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 असेल. ही आगामी ॲडव्हेंचर बाईक जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. हिंदुस्थानात टेस्ट दरम्यान ही बाईक अनेक वेळा दिसली आहे. ही टीव्हीएसच्या नवीन आरटी-एक्सडी4 इंजिनद्वारे समर्थित असेल, जी 2024 मध्ये मोटोसोलमध्ये सादर करण्यात आली होती.
Hero Karizma XMR 250
हिरो मोटोकॉर्प या महिन्यात त्यांची नवीन स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे. या वर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पो 2025 मध्ये, कंपनीने करिझ्मा एक्सएमआर 250 सादर केली. बाईकची डिझाइन करिझ्मा एक्सएमआर सारखीच ठेवण्यात आली आहे. पण यातील ग्राफिक्स थोडे वेगळे असू शकतात. ही बाईक 250 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे, जी 30 पीएस पॉवर आणि 25 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.