रात्री अपरात्री होणाऱ्या दातदुखीला करा आता रामराम! घरगुती उपायाने दातदुखी होईल बरी

दातदुखी व्हायला लागल्यावर डाॅक्टरांकडे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. अनेकदा दातदुखी ही डोकेदुखी ठरते, शिवाय दातदुखीवर आयत्यावेळी इलाज काय करायचा असाही प्रश्न पडतो. बरेचदा तर दातदुखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, हे दुखणं कालांतराने अधिक वाढण्याची शक्यता अधिक असते.

 

दातदुखी वाढल्यास या दुखण्यातून मार्ग काढण्यासाठी फक्त डाॅक्टर हाच एक पर्याय असतो. परंतु दातदुखी कमी प्रमाणात असतानाच आपण काही घरगुती उपाय करुनही दातदुखीवर उपचार करु शकतो. दातदुखीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपायांनीही बरे वाटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बरेचदा रात्री अपरात्री आपल्याला दातदुखीला सामोरे जावे लागते. दातांचे दुखणे म्हणजे एक भयंकर दुखणे म्हटले जाते. परंतु घरच्या घरी काही उपाय करून आपण दातदुखीवर आराम मात्र नक्कीच मिळवू शकतो.

 

 

दातदुखीवर घरगुती उपचार

 

मोहरीचे तेल जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी वापरले जाते. दातदुखीमध्ये आराम मिळवण्यासाठी याचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. यासाठी तेलात चिमूटभर मीठ मिसळून हिरड्यांना मसाज केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

 

लिंबाचा वापर चव आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. यासाठी दातदुखीच्या ठिकाणी लिंबाचा तुकडा लावावा, त्यामुळे वेदना कमी होऊ शकतात.

 

 

 

दातदुखीवर बटाटा खूप गुणकारी मानला जातो. दुखणाऱ्या जागेवर बटाट्याचा तुकडा लावल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

 

पेरू हे असेच एक फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासोबतच त्याची पानेही गुणधर्माने परिपूर्ण आहेत. दातदुखीत पेरूची ताजी पाने चघळल्याने वेदना कमी होतात.

 

मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक असून, मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने दातदुखीवर आराम मिळतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)