सत्तेसाठी साठमारी सुरूच: मिंधेंच्या आजच्या बैठका रद्द, तर अजित पवार दिल्लीकडे रवाना

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले आहेत. महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असे असताना देखील अजूनही मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात येत नसल्यानं जनता बुचकळ्यात पडली आहे. आता भाजपकडे तगडे संख्याबळ असताना देखील त्यांना सत्ता स्थापन करण्यात कसली अडचण आहे? अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू असून नाराजी व्यक्त होत आहे. भाजपकडे प्रचंड बहुमत असून त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद रहावे अशी मागणी भाजपचे नेते करत आहेत यामुळे मिंधे गटाची चांगलीच अवस्था झाली आहे. तर महत्त्वाची पदे देखील भाजपने आपल्याचकडे ठेवण्यावर जोर दिला आहे.

मिंधे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्था आहे. खुद्द मिंधेही गावी जाऊन बसले होते. त्यानंतर ते ठाण्यात दाखल झाले आहेत. मात्र त्यांची तब्येत अद्यापही बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. ताप आणि थ्रोट इन्फेक्शन वाढल्यानं त्यांच्या नियोजत बैठका रद्द करणयात आल्या आहेत.

तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सरकार स्थापनेबाबत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेणार असल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.