
सध्या अनेकांच्या हातात स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असतात. पॉवरफुल प्रोसेसर आणि हाय रिझोल्यूशन डिस्प्ले फोनमध्ये असल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते. त्यामुळे अनेक जणांची कामे खोळंबतात किंवा फोनला सतत चार्ंजगला लावावे लागते. जर स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर या ठिकाणी बॅटरी लाईफ वाढवणाऱया काही खास टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने फोनची बॅटरी वाचवण्यात नक्की मदत मिळू शकते. जाणून घ्या खास टिप्स.
बॅकग्राऊंड ऍप्स बंद करा – सर्वात आधी आपल्या फोनमधील बॅकग्राऊंड ऍप्स बंद करा. जे महिनोमहिने वापरले जात नाहीत. ते ऍप्स बॅकग्राऊंडला सुरू असतात. त्यामुळे असे जे काही ऍप्स असतील, ते तत्काळ बंद करावेत. असे केल्यास बॅटरी वाचवण्यास मदत होऊ शकते.
फोनचा ब्राईटनेस कमी करा – फोनच्या स्क्रीनवर जास्त ब्राईटनेस ठेवल्याने फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे फोनचा ब्राईटनेस नेहमी कमी ठेवा किंवा ऍडाप्टिव ब्राईटनेसचा वापर करा. यामुळे नक्कीच बॅटरी वाचवण्यात मदत मिळेल.
स्क्रीन टाईम आऊट कमी करा – जर फोनचा स्क्रीन टाईम आऊट कमी केल्यास बॅटरी वाचवण्यात मदत होईल. ज्या वेळी फोनची गरज आहे, त्याच वेळी फोनला सुरू ठेवा. विनाकारण फोन सुरू ठेवून फोनचा स्क्रीन टाईम आऊट वाढवू नका.
जीपीएस आणि नेटवर्क सेटिंग्स बंद ठेवा – फोनच्या जीपीएसमुळे फोनमधील सर्वात जास्त बॅटरी संपते. जर तुम्ही जीपीएसचा वापर करत नसाल तर याला बंद करा. याशिवाय ब्लूटूथ आणि वायफायला त्याच वेळी ऑन करा, ज्या वेळी तुम्हाला गरज असेल. असे केल्यास बॅटरीत बचत होईल.
हॅप्टिक फीडबॅक बंद करा – स्मार्टफोनमध्ये टच वेळी व्हायब्रेशन (हॅप्टिक फीडबॅक) चा वापर केल्यास बॅटरी लवकर संपते. हे फीचर बंद केल्याने बॅटरी जास्त वेळ टिकते.