ड्रायव्हरने पँटची चेन खोलली आणि… अभिनेत्रीने सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर किस्सा

अलिकडेच नेटफिल्क्सवर रिलीज झालेल्या “त्रिभुवन मिश्रा CA Topper” या वेबसीरीजमधील तिलोत्तमा शोम ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. सीए टॉपर या वेबसीरीजच्या निमित्ताने अभिनेत्री अनेक मुलाखतींना हजर असते. अशाच एका मुलाखती दरम्यान तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या एका भयंकर प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.

तिलोत्तमाने मुलाखतीमध्ये दिल्लीतील एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत केलेल्या विनयभंगाची घटना उघडकीस आणली आहे. आजही ती घटना आठवल्यानंतर अस्वस्थ व्हायला होत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. या घटने बद्दल सांगताना ती म्हणाली की, मी दिल्लीत होते. माझे राहण्याचे ठिकाण वसंतकुंज येथे होते तर मुनिरकापर्यंत बसने यायची त्यापुढे जाण्याकरीता एकच बस उपलब्ध होती. मुनिरका ते वसंतकुंज ही वाट अत्यंत निर्जन होती व तिथे कायम काळोख असायचा. संध्याकाळची वेळ होती, मी बसची वाट बघत होते, तासभर वाट पाहिल्यानंतरदेखील बस आली नव्हती आणि अंधार पडत होता. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली आणि त्यातून सहाजण बाहेर पडले. संकटाची चाहुल लागताच मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मी थोड दूर गेले पण मागून ती माणसे माझ्यावर कमेंट करू लागली. काही वेळाने माझ्या दिशेने दगड फेकला. दगड मारल्यानंतर मी आणखी थोड पुढे गेले आणि रस्त्याच्या मधोमध उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडून लिफ्ट मागू लागले. तीन चार गाड्या जवळून गेल्या पण कोणी थांबत नव्हते. तेवढ्यात एक गाडी थांबली. गाडीवर वैद्यकीय चिन्ह होते. मला वाटले की वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस चांगला असावा. मी गाडीत बसले, गाडी थोडी पुढे जाताच त्याने त्याच्या पँटची झीप उघडली, व त्याने माझा हात धरला. मी त्याला विरोध करताच त्याने मला गाडीतून बाहेर फेकले. या भयंकर घटनेनंतर अभिनेत्रीने कसेबसे आपल्या मैत्रिणीचे घर गाठले. कारण घडलेल्या प्रसंगानंतर तिला घरी जायचे नव्हते. तिची अवस्था पाहून आई-वडील काळजीत पडले असते.

तिलोत्तमा शोमने आत्तापर्यंत अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केले आहे. दिल्ली क्राइम, द नाईट मॅनेजर तसेच लस्ट यांसारख्या अनेक वेब सीरीजमध्ये तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. दिल्ली क्राईम – 2 मधील तिच्या अभिनयासाठी अभिनेत्रीला फिल्मफेअर ओटीटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.