अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक

प्रसिद्ध विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांना आज सकाळी ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चार दशकांच्या कारकीर्दीत टिकू तलसानिया यांनी ‘देवदास’, ‘जोडी नंबर वन’, ‘शक्तिमान’, ‘कुली नंबर 1’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जुडवा’, ‘प्यार किया तो डरना क्या’ अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे.