तिकीट, कॅब, हॉटेल…सारे काही एका अ‍ॅपमध्ये; लवकरच रेल्वेचे ‘स्व रेल’ सुपर अ‍ॅप प्रवाशांच्या हाती

रेल्वे गाड्यांची चौकशी करण्यासाठी किंवा तिकिटांसाठी अनेकदा प्रवाशांना रांगा लावाव्या लागतात. यापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून रेल्वे ‘स्व रेल’ नावाचा सुपर अ‍ॅप तयार करत आहे. सध्या सुपर अ‍ॅपची चाचणी सुरू आहे. तब्बल 10 हजार लोकांद्वारे त्याचे परीक्षण केले जात आहे. अ‍ॅप एप्रिलनंतर कधीही प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. त्यामध्ये तिकीट, कॅब, हॉटेल, व्हिलचेअर बुकिंग, मेडिकल एमर्जन्सी, पोलीस संपर्क अशी व्यवस्था आहे.

‘स्व रेल’ अ‍ॅप अँड्रॉईड व आयओएस असे दोन्हींवर चालेल. रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सेंटर (क्रिस) युनिटने दोन वर्षांत अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यामध्ये सर्व सुविधा असतील. जणू सिंगल सोल्युशन विंडो तयार केले आहे. ते अँड्रॉईड व आयओएस या दोन्हींवर चालेल.

मनी वॉलेट…तत्काळ रिफंड

सुपर अ‍ॅपमध्ये मनी वॉलेटही असेल. त्यात प्रवासी पैसे भरू शकतात. अनेक वेळा ऑनलाईन बुकिंगवेळी पैसे कापले जातात. मात्र तिकीट काही मिळत नाही. मात्र या अ‍ॅपच्या माध्यमातून कापली गेलेली रक्कम तत्काळ तुमच्या वॉलेटमध्ये परत येईल.

कोणकोणत्या सुविधा मिळतील…

गाडीच स्थिती, आरक्षित-अनारक्षित व प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, ऑनलाईन फूड ऑर्डर, पार्सल बुकिंग, हॉटेल-पॅब व रूम बुकिंग, आसनाची स्थिती, ब्रेक जर्नी तिकिटाचा तपशील, नैसर्गिक संकटाची माहिती, चोरी व इतर गुन्ह्यांच्या तक्रारीची ऑनलाईन व्यवस्था, व्हिलचेअर बुकिंग, कुली बुकिंग, पुलीस प्रीपेड पेमेंट, बोगी क्लिनिंग रिक्वेस्ट, बोगीमधील तांत्रिक दोष दूर करण्यासाठी विनंती, सेवेत घट, भाड्य़ाचा परताव्यासाठी विनंती आदी सुविधा अ‍ॅपवर मिळतील.