अरविंद केजरीवाल यांना नियमित घरचे जेवण दिले जाते, तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांची माहिती

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दररोज घरचं जेवणं दिलं जातं अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच केजरीवाल यांची प्रकृती देखील ठीक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

”केजरीवाल यांच्या तब्येतीची नियमित तपासणँी सुरू असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना घरातून आलेले जेवणच दिले जाते. आम्ही त्यांच्या तब्येतीबाबत दररोज डॉक्टरांकडून अपडेट घेत असतो. अरविंद केजरीवाल यांचे वजन काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांच्या प्रत्येक आजारावर त्यांना योग्य उपचार मिळत आहेत.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात प्रकृती बिघडत असून त्यांचे आतापर्यंत 8 किलो वजन कमी झाल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.