26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर 90 मिनिटांचे संचलन (परेड) असते. त्यातून राष्ट्राच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. टीव्हीवरून परेड पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कर्तव्यपथावर जाऊन हे क्षण अनुभवावे असे अनेकांना वाटते. कोविडनंतर परेडची तिकीट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने खास वेबसाईट विकसित केलेय. या वेबसाईटवर 2 जानेवारीपासून तिकीट मिळवता येतील. तिकीटाची किंमत 20 रुपये, 100 रुपये आहे. तिकीटांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक दिवशी ठराविक तिकीटांची विक्री होईल. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ‘ स्वर्णिम भारत- विकास आणि वारसा’ अशी आहे. यंदा पाच हजार कलावंत देशाचा विकास, वारसा आणि संस्कृतीची झलक दाखवतील. एकूण 25 चित्ररथ असतील. वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांसह माजी सैनिक, डीआरडीओ, आसाम रायफल्स, कोस्ट गार्डचे शानदार प्रदर्शन होईल.
तिकीट कसं काढायचं?
अधिकृत वेबसाइट aamantran.mod.gov.in वर जावे लागेल. तिथे `Book your ticket here’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर `Register to Book Ticket’ वर क्लिक करून नाव भरावे. मोबाइल नंबर टाकून `Request OTP’ वर क्लिक करावे. रजिस्टरवर क्लिक करून लॉगिन करावे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून स्वतःसाठी, इतरांसाठी परेडचे तिकीट बुक होईल.