मानवी शरीर हे अनेक पेशींनी बनले आहे. यामध्ये ग्रंथीची संख्या मोठी असते. तसेच थायरॉईडमुळे घसा दुखणे, हार्टअटॅक आणि मेंदूवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
आताच्या काळात महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे महिलांमध्ये सतत चिडचिड होणे, मासिक पाळी अनियमीत होणं यांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण नक्की थायरॉईड आजार कशामुळे होतो? हा बरा होऊ शकतो का ? जाणून घेऊया सविस्तर…..
मानवी शरीर हे अनेक पेशींनी बनलं आहे. यामध्ये ग्रंथींची संख्या मोठ्या प्रमाणात असून आपल्या शरीरातील घशात असणाऱ्या ग्रंथींना थायरॉईड म्हणतात. आपल्या शरीरातील स्नायू, ह्रदय आणि मेंदूचे काम विना अडथळा करण्याचे काम थायरॉईड ग्रंथी करत असतात. पण या ग्रंथींमधून होणारा संप्रेरकांचा स्त्राव आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाला की स्त्रीयांमध्ये वजन वाढणे, भूक मंदावने, शरीर सुस्त पडणे आणि मासिक पाळी अनियमित होण्यासह गर्भधारणेत अडचण निर्माण होते.
थायरॉईडची समस्या कशामुळे होते?
थायरॉईडचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे हायपोथायरॉईड, हायपर थायरॉईड आणि गलगंड. पण यापैकी हायपोथायरॉईड, हायपर थायरॉईड जास्त प्रमाणात होतो.
हायपोथायरॉईडमध्ये ग्रंथींमधून होणारा संप्रेरकांचा स्त्राव कमी झाल्यास वजन वाढते, भूक मंदावते आणि मासिक पाळीच्याही समस्या होतात.
हायपर थायरॉईडमध्ये आवश्यकतेपेक्षा संप्रेरकांचा स्त्राव झाल्यास चिडचिडेपणा, चिंताग्रस्त वाढून उष्णतेचा त्रास होतो. आणि स्वभावात चढ उतार होऊ लागतात.
गलगंड या प्रकारात थायरॉईड च्या ग्रंथींना सूज येते. या आजारात औषधे घेऊन हा त्रास कमी होऊ शकतो. पण समस्या मोठी असल्यास मात्र ऑपरेशन करावे लागते.
थायरॉईडची कारणे
कॅफिनचे अधिक सेवन केल्याने थायरॉईडचा त्रास होतो.
महिलांना प्रस्तुतीनंतर हा त्रास अधिक होतो.
दुसऱ्या काही आजारांची औषधे असतील तरीही थायरॉईडचा त्रास वाढू शकतो.
थायरॉईड बरा होऊ शकतो का ?
थायरॉईडचा त्रास औषधे घेऊन बरा होऊ शकतो. यातून 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होतात. परंतु थायरॉईडच्या हायपर थायरॉईड या प्रकारामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे ह्रदयविकाराची समस्या होऊ शकते.
नियमीत व्यायाम, संतूलित आहाराने थायरॉईडवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.