Throt Infection – खवखवणाऱ्या घशावर खात्रीशीर घरगुती रामबाण उपाय, वाचा सविस्तर

बदलत्या हवामानानुसार शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. मार्च महिना सुरु झाला आहे. दिवसा गर्मी रात्री गारवा असे वातावरण आहे. उष्ण तापमान वाढू लागले आहे. या बदलत्या हवामानात अनेक लोक आजारी पडू लागले आहेत. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे विषाणूजन्य ताप, खोकला-सर्दी, घसा खवखवणे यासारख्या आजारांना सामोरे जात आहेत .शरीर दुखणे, नाक बंद होणे आणि डोकेदुखी या सारख्या समस्या देखील त्रास देते असतात. घशात खवखव झाल्यामुळे केवळ बोलण्यातच नाही तर खाण्यापिण्यातही समस्या येतात.तसेच घशात सुज आणि वेदना होतात. या वेदनांचे निवारण करण्यासाठी आपण अनेक औषध आणि सिरप घेतो मात्र त्याचादेखील काहीही उपयोग होत नाहि. अशा परिस्थितीत कहि घरगुती उपाय उपयुक्त ठरु शकतात.

  • घशा शेकवणे ही एक प्रभावी पद्धत आहे. जी घशाच्या समस्या दुर करण्यास मदत करते. गरम पाण्यात टॉवेल भिजवा आणि तो तुमच्या मानेवर ठेवा. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळेल आणि वेदना कमी होतील.
  • मध हा एक नैसर्गिक उपाय आहे . मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे घसा खवखवणे कमी करतात. तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून पिऊ शकता किंवा थेट घशावर लावू शकता.
  • घशाच्या समस्या दूर करण्यासाठी आले हे रामबाण औषध मानले जाते. तुम्ही जर गरम पाण्यात आले मिसळून पिऊ शकता किंवा चहा बनवून त्यात आले टाकून ते पिऊ शकता.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे ही अगदी सोपी आणि उत्तम पद्धत आहे. मिठाच्या पाण्यात थोडी हळद टाकल्याने आणखी फायदा होऊ शकतो. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि घशातील खवखवण्याची समस्या कमी होते.