निर्माणाधीन भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शाळेची निर्माणाधीन भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी राजस्थानमध्ये घडली. अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. जालोर जिल्ह्यातील पोसाना गावात सरकारी शाळेची निर्माणाधीन भिंत कोसळली. शाळेत खोली बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.

बांधकाम सुरू असताना भिंत खचल्याने ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच सायला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ढिगाऱ्याखालून मृत कामगारांचे मृतदेह बाहेर काढले असून जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.