पुणेकरांची ऐतिहासिक कामगिरी; तीन जणांची तांत्रिक अधिकारी-पंच म्हणून निवड

पुणे जिल्हा व मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या तीन जणांची एकाच वेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तांत्रिक अधिकारी-पंच म्हणून निवड झाली असून पुणेकरांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

सीए गिरीश नातू यांची डेप्युटी रेफ्री-2 म्हणून, सुदीप बर्वे यांची पंच-3 म्हणून, तर शैलेश कुलकर्णी यांची पॅरालिम्पिकसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. पुण्यातील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी या तिघांचे अभिनंदन केले आहे. गिरीश नातू यांनी 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम पंच म्हणून कामगिरी बजावली होती. ऑलिम्पिकमध्ये हा मान मिळविणारे ते पहिले हिंदुस्थानी ठरले होते. त्यांनी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मॅच को-ऑर्डिनेटर म्हणून कामगिरी बजावली. तसेच बॅडमिंटन एशिया संघटनेच्या रेफरी अॅसेसर कमिटीचे ते अध्यक्ष आहेत.