
छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. येथील इंद्रावती नॅशनल पार्क परिसरातील जंगलात सकाळी सुरक्षा कर्मचाऱयांचे पथक नक्षलवादविरोधी मोहिमेवर निघाले असता चकमक झाली. परिसरात शोधमोहीम राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईसह राज्यात यावर्षी आतापर्यंत वेगवेगळ्या चकमकीत 138 नक्षलवादी ठार झाले. दरम्यान, शुक्रवारी नारायणपूर जिह्यातील पाच नक्षलवाद्यांनी शस्त्रs खाली ठेवत आत्मसमर्पण केले. यापैकी दोन जणांवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते.