
छत्तीसगडच्या दंतेवाडा-बीजापूर जिह्याच्या सीमेवर आज सुरक्षा दलांनी सुधीर ऊर्फ सुधाकर याच्यासह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली. या कारवाईत घटनास्थळावरून इंसास रायफल, 303 रायफल, 12 बोर रायफल यांसह अनेक स्फोटकेही जप्त करण्यात आली. दरम्यान बस्तर रेंजमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी 2025 मध्ये तब्बल 100 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.