पुष्पा 2 सिनेमाच्या प्रिमीयर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीनंतर 35 वर्षीय महिला आणि तिच्या 8 वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 डिसेंबर रोजी रात्री संध्या थिएटरमध्ये पुष्पा सिनेमाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता अल्लु अर्जुनच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवू न शकल्याप्रकरणी अल्लु अर्जुनच्या सुरक्षा पथकासह अल्लु अर्जुन आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 105 आणि 118 (1) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.