
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच चौकशीसाठी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुक्ताईनगरच्या एका जत्रेत सात जणांनी रक्षा खडसे यांची कन्या आणि तिच्या मैत्रिणींचा पाठलाग केला आणि त्यांची छेड काढली. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळी या तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींनाही लवकरात लवकर अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.