गोरेगावमधील पशु व मत्स्यविद्यापीठाची तीन एकर जमीन राज्य सरकराने मुंबई बँकेला दिली आहे. या जागेवर सहकार भवन बांधण्यात येईल. फक्त शिक्षण व संशोधनासाठी दिलेल्या जागेच्या उद्देशातच सरकारने बदल केला आहे. त्याचा जीआर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केला. शैक्षणिक कामासाठी दिलेली जागा व्यावसायिक वापरासाठी दिल्याचा हा निर्णय वादात सापडण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सरकारच्या वेबसाईटरून जीआर तातडीने हटवला आहे.
ही जमीन मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय आयुक्तांनी सरकारला केली होती. दरम्यान, या जागेच्या बदल्यात मुंबई बँक ही पशुवैद्यक महाविद्यालाच्या परळ व गोरेगाव कँम्पसमध्ये प्रस्ताविक विकास कामांसाठी 100 कोटी रुपये विकास अनुदान देणार आहे.