रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन, लष्कर-ए-तैयबाच्या सीईओच्या नावे फोन

विमाने, लॉ फर्म नंतर आता रिझर्व्ह बँकेला धमकीचा फोन आला आहे. बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा कॉल करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे सांगितले.

फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे सांगत, मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे असे म्हणत फोन ठेवून दिला. यानंतर बँकेच्या सुरक्षारक्षकाने माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मात्र कुणीतरी खोडसाळपणाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.