आरबीआयला ‘लष्कर ए तोयबा’च्या नावाने धमकीचा फोन 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ला नुकताच ‘लष्कर ए तोयबा’च्या नावाने धमकीचा फोन आल्याची घटना घडली आहे. फोनवर बोलणाऱयाने तो ‘लष्कर ए तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगितले. बँक बंद करा, असे सांगून त्याने फोन ठेवला. सुरक्षा रक्षकाने याची माहिती माता रमाबाई मार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून धमकीच्या फोनचे प्रकार सुरु आहेत. कधी सलमानच्या नावाखाली वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन मेसेज येण,s तर कधी विमानात बॉम्ब ठेवल्याचे ट्विट करण्याच्या घटना घडत आहेत. या घटना घडत असतानाच शनिवारी आरबीआयच्या कस्टमर केअरवर एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने ‘लष्कर ए तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले.