राममंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, उत्तर प्रदेशातील 15 जिह्यांना तामीळनाडूतून धमकीचा ई-मेल

अयोध्येतील राममंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून याबाबतचा ई-मेल अयोध्या राममंदिर ट्रस्टसह उत्तर प्रदेशातील 10 ते 15 जिह्यांतील महानगर दंडाधिकारी यांना आला आहे. सोमवारी रात्री उशिरा हा धमकीचा ई-मेल आला आणि राममंदिराभोवतीचे सुरक्षाकडे अधिक मजबूत करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः तारांबळ उडाली. हा धमकीचा ई-मेल तामीळनाडूतून आल्याची माहिती आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  आहे.