लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विमानात धमकीचे पत्र सापडले, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानात धमकीचे पत्र सापडल्याने एकच गोंधळ उडाला. एका प्रवाशाला विमानातील बाथरुममध्ये हे पत्र सापडले. त्यानंतर प्रवाशाने ते पत्र फ्लाईट अटेंडंटकडे दिले. धमकीच्या पत्राची माहिती कळताच विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण होते.

फ्लाईट अटेंडंटने तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर सुमारे तीन तास विमानात सर्च ऑपरेशन करण्यात आले.

सर्च ऑपरेशनमध्ये विमानात कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. यानंतर ही धमकी निव्वळ अफवा असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.