शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी), नवीन कृषी कायद्यांतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी 6 डिसेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी शेतकरी संघटनांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डरवर हरयाणा आणि पंजाब पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला.दरम्यान, हरयाणा पोलिसांनी आज शंभू बॉर्डरवर बॅरिकेड्स आणखी वाढवले.
राकेश टिकैत यांची सुटका
बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांची आज सुटका करण्यात आली. हा हुकूमशाहीविरोधात लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया टिकैत यांनी सुटकेनंतर दिली.
34 शेतकऱ्यांना अटक
नोएडा येथे पंचायत भरवण्यापूर्वीच 34 पोलिसांना बुधवारी रात्री उशिरा झीरो पॉइंटवर आंदोलनाला बसलेल्या 34 शेतकऱ्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.