हजारो विद्यार्थ्यांनी भरले कल्पनेचे रंग, शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत भव्य चित्रकला स्पर्धा 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने सांस्पृतिक कला व क्रीडा महोत्सवाअंतर्गत दक्षिण-मध्य मुंबईत विधानसभानिहाय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही चित्रकला स्पर्धा केवळ स्पर्धकांसाठी नव्हे, तर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा जागर घडवणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. या स्पर्धेमुळे तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.

शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, उमेश महाले यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी 400 स्पर्धकांनी सहभाग घेतला. धारावी विधानसभा क्षेत्रात माजी आमदार बाबूराव माने, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, उपविभागप्रमुख महादेव शिंदे, धारावी विधानसभा निरीक्षक प्रकाश आचरेकर, माजी नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश तटे, आनंद भोसले, नुतू पटन, बाबा सोनवणे, भास्कर पिल्ले, विधानसभा समन्वयक सुरेश सावंत यांची उपस्थिती होती. येथे 400 ते 500 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. वडाळा विधानसभेत विभाग संघटक श्रद्धा जाधव, वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, संघटिका सुनीता आयरे, माधुरी मांजरेकर, नीलेश बडदे, रवी गुप्ता, मयूर कांबळे आदींच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. येथे 500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मावती शिंदे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा संघटक निमिष भोसले, महेंद्र नाकटे, गजानन पाटील, आनंद जाधव, नीलम डोळस, रुक्मिणी भोसले, सुहासिनी ठापूर, सुरेश लांडगे, दत्ता भोसले, प्रशांत म्हात्रे, किरण लोहार, राजेंद्र पोळ, अरुण हुले, प्रभाकर भोगले, शारदा गोळे, छाया हमीदानी, अनिता महाडिक, लता कडू, रामदास कांबळे आदी उपास्थित होते. या स्पर्धेत चेंबूर विधानसभाअंतर्गत 625, अणुशक्तीनगरमधील 320 तसेच शीव येथील 335 स्पर्धक सहभागी झाले होते.