म्हणे 400 पार! लोकसभेत अर्धे संख्याबळही मिळवू शकले नाहीत; राज्यसभा खासदाराचा भाजपवर निशाणा

लोकसभेत मंगळवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. यावेळी कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024′ संसदेत मांडले. या विधेयकावर EVM ने मतदान घेण्यात आले. मात्र यावेळी एकूण 369 सदस्यांनी मतदान केले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली आहेत. ईव्हीएम मतदानाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले. त्यावेळी प्रस्तावाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते मिळाली. यावरून या विधेयकाच्या बाजून मोदी सरकाला दोनतृतीयांश मते मिळाली नसल्याने याला असलेला विरोध स्पष्ट होतो, असे विरोधकांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांनीही याबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी 400 पारचा नारा दिला होता. मात्र, आता त्यांनी लोकसभेत अर्ध्या खासदारांचे मतही मिळवता आले नाही. यावरून साकेत गोखले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभेत “400 पार” जाण्याचा दावा केला होता. मतदानादरम्यान 272 खासदारांचे अर्धे लोकसभेचे संख्याबळही गोळा करण्यासाठी ते आता धडपडत आहेत. अहंकारी कसे पडले आहेत! असे त्यांनी पोस्टमध्ये म्हणत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

या विधेयकाबाबत प्रथम EVM द्वारे मतदान घेण्यात आले. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले. त्यावेळी प्रस्तावाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली आहेत. यावरून काँग्रेससह विरोधकांनी सरकारला दोनतृतीयांश मतेही मिळवता आलेले नाही. विधेयकाच्या प्रस्तावाला 269 तर विरोधात 198 मते पडली आहे. म्हणजेच या विधेयकासाठी आवश्यक संख्याबळ सरकारकडे नसल्याचे काँग्रेस नेते मणिकम टॅगोर यांनी म्हटले आहे.