संविधानावर हल्ला करणारेच संविधान हत्या दिन पाळतायत; प्रियांका गांधी यांचा मोदींवर निशाणा

संविधान संरक्षणाची पेंद्रातील सत्ताधाऱयांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ज्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीला विरोध केला, संविधानावर हल्ला केला तेच लोक आज संविधान हत्या दिन पाळतायत, अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

भारतातील जनतेने ऐतिहासिक लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे ज्या लोकांना संविधानावर विश्वास आहे, ते नक्कीच संविधानाची रक्षा करतील. मात्र ज्या लोकांनी संविधानाच्या अंमलबजावणीला विरोध केला, संविधानाची समीक्षा करण्यासाठी आयोगाची स्थापना केली, संविधान रद्द करण्याचे आवाहन केले आणि आपल्या प्रत्येक कृतीतून सातत्याने संविधानावरून हल्ला केला तेच लोक आज संविधान हत्या दिन पाळणार आहे याचे आश्चर्य वाटायला नको, अशी टीका 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याच्या पेंद्र सरकारच्या निर्णयावर प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत केली आहे.