Yoga In Summer Season- उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि मनाला शांत करणारे ‘शवासन’ करायलाच हवं!

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. उष्णतेचा शरीरावर आणि मनावरही परिणाम होऊ लागलाय. अशा परिस्थितीत घरबसल्या तुम्ही स्वतःच्या मनाला शांत करणारे योगासन करु शकता. सध्याच्या घडीला उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रत्येक व्यक्तीची अवस्था दयनीय आहे. या उष्णतेचा केवळ शरीरावर नाही तर, मानसिक आरोग्यावरही चांगलाच परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठराविक योगासनं केल्यामुळे, आपल्या शरीराला आणि मनालाही आराम मिळतो. उन्हाळ्यात शवासन केल्याचे खूप सारे फायदे आहेत. शवासन आपल्याला नवचैतन्य आणण्यास मदत करते.

शवासन करण्याचे फायदे

शवासन केवळ शरीराला आराम देत नाही तर ते ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जाते. यामुळे शरीरातील पेशीना उर्जा मिळते. तसेच ताणतणावापासून मुक्ती मिळते.

उन्हाळ्यात शवासन केल्यामुळे, शरीराला नवचैतन्य तर मिळतेच शिवाय दिवसभराच्या धावपळीमध्ये काम करण्याची उर्जा मिळते.

उन्हाळ्यात शरीर आणि मन दोन्ही फार पटकन थकते. अशावेळी शरीराला शांतता मिळवून देण्याचे काम शवासन करते.

शवासन केल्याने, आपलं शरीर शांत राहते. यामुळे आपले ब्लड प्रेशर कमी होते. तसेच हृदयाला आराम देण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते.

शवासनाचा मुख्य फायदा म्हणजे आपले लक्ष आणि एकाग्रता वाढविण्यास मदत होते. शवासन करताना आपले लक्ष आपोआप शरीराच्या प्रत्येक भागावर केंद्रित होऊ लागते. तुमचा मेंदू आपोआप एकाग्रता आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Yoga- कंबरेवरील, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज पाच मिनिटे या आसनाचा सराव करा.. कमरेवरील चरबी होईल दूर

शवासन हा झटपट ऊर्जा मिळविण्याचा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्ग आहे. फक्त १० मिनिटे शवासन केल्यानंतर आपण ताजेतवाने होऊ शकतो.