आपल्या व्हॅलेंटाइनला या रोमँटिक ठिकाणी फिरायला न्या अन् तिचं मन जिंका!

काही दिवसांनी व्हॅलेंटाइन आठवड्याला सुरुवात होणार आहे. या काळात अनेक जोडप्यांना क्वालिटी टाइम घालवण्यासाठी फिरण्याचे प्लॅन करत असतात. अशावेळी फिरण्यासाठी कुठे जावे? असा प्रश्न जोडप्यांना पडलेला असतो. यावेळी जगभरातील फिरण्याची अनेक ठिकाणे जाणून घेऊया…

इस्तंबूल, तुर्की
इस्तंबूल हे अनेक सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. येथे केवळ हिंदुस्थानातूनच नाही तर परदेशातूनही लोक भेट देण्यासाठी येतात. जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा असेल तर हे ठिकाण परिपूर्ण आहे. येथे जोडपे बॉस्फोरस डिनर क्रूझ, कॅमेलिका हिल आणि पियरे लोटी हिलला भेट देऊ शकतात.

स्वीत्झर्लंड
बर्फाळ दऱ्या कोणाला आवडत नाहीत? जर तुम्हाला थंड वारा आणि सुंदर दऱ्या आवडत असतील तर स्वित्झर्लंड हे परिपूर्ण ठिकाण आहे. टिटलिस आणि जंगफ्राऊ येथे बर्फाचा आनंद घेता येतो.

पॅरिस
पॅरिस हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पॅरिसला लव्ह सिटी देखील म्हणतात. पॅरिसमध्ये जोडपे व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकतात. येथील आयफेल टॉवर हे सर्वात रोमँटिक ठिकाण मानले जाते. येथे सीन नदीत क्रूझ राईडचा आनंदही घेता येतो.

व्हेनिस, इटली
इटलीतील व्हेनिस शहर जगभर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. व्हेनिस हे पाण्याच्या मध्यभागी वसलेले शहर आहे. येथे जोडप्यांना ग्रँड कॅनॉलमध्ये गोंडोला राईडचा आनंद घेता येऊ शकतो. याशिवाय, जोडपे सॅन मार्को स्क्वेअरवर एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात.