‘या’ देशात आहेत जगातील सर्वात फिट लोक, लठ्ठ लोकांना सुनावली जाते शिक्षा

लठ्ठपणा ही जगातील एक मोठी समस्या बनली आहे.  अनेक लोक या समस्येचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे जगातील सर्वात फिट लोक राहतात.  होय, या देशातील बहुतेक लोक फिट आहेत. इथे लठ्ठ लोकांना शिक्षा सोनवण्याची तरतूद आहे. काय आहे याशी संबंधित कायदा, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

जगातील सर्वात फिट लोक सिंगापूरमध्ये राहतात. त्यांच्या फिटनेससाठी येथील कायदा ही जबाबदार आहे. सिंगापूरमध्ये लठ्ठ लोकांसाठी कायदा आहे. 40 वर्षांवरील लोक या कायद्याच्या कक्षेत येतात.

सिंगापूरचा मोटाबो कायदा

सिंगापूरमध्ये “मेटाबो कायदा” म्हणून ओळखला जाणारा एक आरोग्य उपक्रम आहे. हा कायदा जपानच्या मेटाबो कायद्यापासून प्रेरित आहे आणि देशातील लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येचा सामना करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कायदा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लागू होतो आणि या लोकांना नियमितपणे कंबर मोजावी लागते. जर एखाद्याच्या कंबरेचा आकार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याला आरोग्य तपासणी करावी लागते आणि आवश्यक असल्यास वजन कमी करण्यासाठी पावले उचलावी लागतात.

सिंगापूरमध्ये लठ्ठपणा गुन्हा आहे का?

सिंगापूरमध्ये लठ्ठपणा हा गुन्हा नाही. मेटाबो कायद्याचा उद्देश लोकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करणे हा आहे, त्यांना शिक्षा करणे नाही. हा कायदा लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक करतो आणि त्यांना लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य धोक्यांबद्दल सांगतो.