
इस्लामाबाद ः पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 11.47 वाजता इस्लामाबाद आणि देशाच्या उत्तरेकडील भागात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल एवढी होती. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आठवडय़ात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात होते, तर खोली 94 किलोमीटर होती.