Mumbai Crime – चोरट्याने मॉडेलचे घर केले साफ 

मॉडेलच्या घरी चोरटय़ाने हातसफाई केल्याची घटना घडली आहे. 14 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला आहे. या प्रकरणी ना. म. जोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस चोरटय़ाचा शोध घेत आहेत.

तक्रारदार या मूळच्या कर्नाटकच्या रहिवासी असून त्या मॉडेल आहेत. त्या लोअर परळ परिसरात राहतात. त्यांच्याकडे दोन नोकर कामाला आहेत. गेल्या महिन्यात त्या भावासोबत हुबळी येथे गेल्या होत्या. गेल्या आठवडय़ात त्या पुन्हा लोअर परळ येथे आल्या. त्यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली. तेव्हा त्यांना दागिने कुठेच दिसले नाही. घरात चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे.