पंतप्रधान दलितांकडे जात नाहीत, ते फक्त उद्योगपतींच्या कुटुंबीयांच्या लग्नाला जातात, असा हल्लबोल लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. झारखंडमध्ये एका प्रचार सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
येथील धनबादमध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान कधीही दलित आणि आदिवासींकडे जात नाहीत, ते फक्त उद्योगपतींच्या कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाला हजेरी लावतात. ते म्हणाले की, जातीच्या जनगणनेतून देशातील संपत्तीचे वितरण कसं होतं, हे उघड झालं पाहिजे.
‘भाजप तुम्हाला वनवासी म्हणते’
ते म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, पण भाजप तुम्हाला वनवासी म्हणते. आदिवासी म्हणजे देशाचा पहिला मालक. तर वनवासी म्हणजे तुम्हाला देशात कोणतेही अधिकार नाहीत. ते हळूहळू तुमची जंगले हिसकावून घेत आहेत. पण जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क तुमचा आहे, त्याचा लाभ तुम्हाला मिळायला हवा, अशी आमची इच्छा आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही जाहीरनाम्यात झारखंडसाठी इंडिया आघाडीची 7 गॅरंटी दिली आहे. अन्न सुरक्षेची गॅरंटी, 1932 आधारित खत्यानची गॅरंटी, मैया सन्मानाची गॅरंटी, सामाजिक न्यायाची गॅरंटी, रोजगार आणि आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, शिक्षणाची गॅरंटी, शेतकरी हिताची गॅरंटी.
ते पुढे म्हणाले, ‘देशात सुमारे 50 टक्के ओबीसी, 15 टक्के दलित, 8 टक्के आदिवासी आणि 15 टक्के अल्पसंख्याक समाजाचे लोक आहेत. पण देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गातील व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही.
झारखंड के लिए INDIA की 7 गारंटी
🔷 गारंटी खाद्य सुरक्षा की
* 450 रुपए में गैस सिलेंडर
* हर व्यक्ति को 7 किलो राशन🔷 गारंटी 1932 आधारित खतियान की
* 1932 आधारित खतियान पर स्थानीयता नीति लाई जाएगी
* सरना धर्म कोड लागू होगा
🔷 गारंटी मैया सम्मान की
* महिलाओं को 2,500 रुपए की… pic.twitter.com/SWtHyqQ18A
— Congress (@INCIndia) November 9, 2024