![neehar (78)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-78-696x447.jpg)
ग्रुमिंग हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. ग्रुमिंग मधला एक प्रकार म्हणजेच नेलपेंट. नेलपेंटची आवड लहानांपासून मोठ्यांना सर्वांना असते. अशावेळी नेलपेंटची निवड करणं हाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. इन ट्रेंड नेलपेंटची निवड करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हव्यात ते आपण बघूया.
अनेकदा नेलपेंट घेऊनही ती या ड्रेसवर जात नाही. मला चांगली दिसत नाही अशी तक्रार आपणच करत राहतो. पण इतक्या सगळ्या शेड्स घेऊन त्या वापरल्या गेल्या नाहीत तर मग आल्या तशा थेट जातात कचऱ्याच्या डब्यात कारण तो पर्यंत त्या सुकून गेलेल्या असतात. म्हणून खास तुमच्यासाठी आम्ही अशा काही नेलपेंट शेड्स काढल्या आहेत ज्या तुमच्याकडे हव्याच. स्वच्छ, सुंदर आणि चमकदार नखांनाही मस्त नटवायचे सजवायचे असेल तर या शेडस् तुमच्याकडे हव्यात. नखांना दोन ते तीन कोट लावल्यानंतर तुमची नखे डबल किंवा ट्रिपल कोटवर उठून दिसतात. ट्रान्सपरंट मध्ये दोन शेड्स असतात. एक थोडी पिवळ्या रंगाकडे झुकणारी असते तर एक क्रिस्टल क्लिअर असते. तुम्ही क्रिस्टल क्लिअर निवडलीत तर उत्तम. फ्रेंच मेनिक्युअर आवडणाऱ्यांकडे तर हे असायलाच हवे. कारण फ्रेंच मेनिक्युअरला साजेशी क्रिस्टल क्लिअर नेलपेंट शेड आहे.
न्यूड रंगाची सध्या चलती आहे. कारण हा असा रंग आहे जो तुमच्या सगळ्या कपड्यांवर चालू शकतो. अगदी इंडियन पासून ते वेस्टर्न आऊटफिट सगळ्यावर. तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असला तरी हा शेड् कोणालाही चांगला दिसतो. त्यामुळे तुमचा त्वचेचा रंग कोणता याचा विचार याबाबतीत करु नका. या रंगाची आणखी एक खासियत सांगायची झाली तर हा रंग तुमच्या नखांना चांगला तर दिसतो. तुमची नखे खराब झाली असतील तरीही या रंगामुळे आपली नखंही झाकून -जातात. या शेड्स मध्ये ब्रँडनुसार थोडाफार फरक पडत असेल.
लग्नाला किंवा समारंभाला जाण्यासाठी तुमच्याकडे डार्क शेडस् असणे गरजेचे आहे. डार्क शेडस् तुमच्या नखांची शोभा वाढवतात, केवळ इतकंच नाही तर डार्क शेडमुळे नखांचे सौंदर्यही वाढते. डार्क शेडस् तुम्हाला उत्तम कॅरी करता आल्या तर, डार्क शेडइतका सुंदर कोणताही पर्याय नाही.