Blackheads- किचनमधील ‘या’ वस्तूंमुळे आता ब्लॅकहेडस् निघतील चुटकीसरशी! वाचा सविस्तर

आपल्या सौंदर्यात बाधा आणणारे अनेक घटक असतात. ब्लॅकहेडस् त्यातील एक प्रमुख भाग आहे. चेहऱ्यावर येणारे ब्लॅकहेडस् हे अनेकदा त्रासिक ठरतात. आपल्या चेहऱ्यावर नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे ब्लॅकहेडस् निर्माण होतात. अर्थात आपण काळजी घेऊन ब्लॅकहेडस् कमी करु शकतो. नाक, हनुवटी, कपाळावर दिसणारे ब्लॅकहेडस् हे काढणं कठीण असतं. त्यामुळे पार्लरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आपण घरगुती उपायही करु शकतो. घरच्या घरी आपण अगदी साधेसोपे उपाय करुन ब्लॅकहेडस् कमी करु शकतो.

ब्लॅकहेडस् हे मुख्यत्वे तेलकट त्वचेवर खूप दिसून येतात. ब्लॅकहेडस् मुळे आपल्या चेहऱ्याचे रंगरुप पालटते. ब्लॅकहेडस् कमी करण्यासाठी आपल्या किचनमधील अनेक पदार्थ हे उपयोगी पडतात. ब्लॅकहेडस् मुळे चेहरा अतिशय खराब दिसतो. म्हणूनच वेळच्या वेळी हे ब्लॅकहेडस् काढणं गरजेचं आहे.

 

घरच्या घरी ब्लॅकहेडस् कसे काढावे?

ओट्स आणि ग्रीन टी- एक कप ग्रीन टी तयार करा. दरम्यान, ओट्स पावडर बनवण्यासाठी दोन चमचे ओटस् बारीक करा. एका वाडग्यात ओट्स पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात ग्रीन टी घाला. एक पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ब्लॅकहेडस् असलेल्या भागावर लावा. एक्सफोलिएट करण्यासाठी हळूवारपणे आपल्या बोटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा.

 

बेकिंग सोडा हा ब्लॅकहेडस् काढण्यासाठी सर्वात उपयुक्त मानला जातो. दोन चमचे बेकिंग सोड्यात दोन चमचे पाणी घालावे. हे मिश्रण ब्लॅकहेडस् असणाऱ्या ठिकाणी लावावे. मिश्रण लावल्यानंतर चांगला मसाज करुन किमान दहा मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातून किमान दोनदा ही कृती केल्यास, ब्लॅकहेडस् जाण्यास मदत होते.

किचनमधील साखर आणि मध या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण ब्लॅकहेडस् खूप प्रमाणात कमी करु शकतो. साखर आणि मध- दोन चमचे साखर घालून एक चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेडस् आहेत तिथे हे मिश्रण लावा. त्यानंतर त्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. त्यानंतर 8 ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून बघा.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)