Summer Recipes- ‘या’ चटण्या उन्हाळ्यात तुमच्या आहारात असायलाच हव्यात!

उन्हाळ्यात अनेकांना लस्सी, आंबट गोड सरबत, मसालेदार ताक, काकडी, रायता यासारखे ताजेतवाने पदार्थ खायला आवडतात. तसेच दुसरीकडे, चटणी प्रत्येक ऋतूत आवडते, ज्यामुळे जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. उन्हाळ्यात तिखट चटण्या जास्त पसंत केल्या जातात. आपण उन्हाळ्याच्या हंगामासाठी अशाच पाच चटणीच्या पाककृतींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मसालेदार पुदिन्याची चटणी

पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी, पाने देठापासून वेगळी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, जिरे, थोडे काळे आणि थोडे पांढरे मीठ घ्या.

 

आंबटपणासाठी लिंबू, चिंच किंवा कच्चा आंबा वापरा. सर्व गोष्टी व्यवस्थित बारीक करुन घ्या. तुमची पुदिन्याची चटणी तयार होईल.

 

उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी अप्रतिम लागते. तुम्ही ती तूर डाळ भातासोबत खाऊ शकता किंवा ते पराठा किंवा रोटीसोबत देखील खाऊ शकता.

 

गोड आणि आंबट चिंचेची चटणी 

गोड आणि आंबट चिंचेची चटणी बणवण्यासाठी चिंच कोमट पाण्यात भिजवा आणि नंतर त्याच्या बिया काढून टाका. चवीनुसार थोडा गूळ, सुक्या तिखट, थोडे काळे मीठ आणि पांढरे मीठ मिसळा आणि बारीक करा.

हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. चटणी तयार झाल्यानंतर, एक चमचा तेल गरम करा, त्यात हिंग आणि जिरे घाला.

 

 

 

 

 

 

कच्च्या आंब्याची चटणी

हि चटणी बनवण्यासाठी आंबा सोलून त्याचे तुकडे करा.

थोडा गूळ, मीठ, पुदिना, भाजलेले जिरे घ्या आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात मोहरीचा फोडणी देखील घालू शकता.उन्हाळ्यात कच्च्या आंब्याची ही चटणीही चविष्ट लागते.

 

 

 

चविष्ट महाराष्ट्रीयन ठेचा

महाराष्ट्रीयन ठेचा हा पदार्थ प्रत्येक ऋतूत चविष्ट लागतो

हा तयार करण्यासाठी हिरवे कोथिंबीर चिरून घ्या

हिरव्या मिरच्यांचे देठ वेगळे करा. काही शेंगदाणे घ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात शेंगदाणे भाजून घ्या. त्यासोबत जिरे परतून घ्या आणि इतर सर्व साहित्यही घाला. हलके शिजवल्यानंतर ते बारीक बारीक करा.

यानंतर तुम्ही हवे असल्यास लिंबाचा रस घाला. चवीसाठी, तुम्ही लिंबाऐवजी कच्चा आंबा देखील ठेचासोबत बारीक करू शकता.

 

 

 

 

टोमॅटोची ताजी चटणी

उन्हाळ्यात टोमॅटोची चटणीही अप्रतिम लागते.

यासाठी टोमॅटोचे छोटे तुकडे करा आणि कांदे देखील कापून घ्या.

लसूण चिरून घ्या आणि हिरव्या मिरच्याही चिरून घ्या.

एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करा, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घाला आणि ते तडतडेपर्यंत परतवा.

जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर कांदा आणि लसूण सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या आणि नंतर हिरव्या मिरच्या घाला आणि टोमॅटो घातल्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी तिखट घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.

ही चटणी 10 मिनिटांत तयार होते. जर तुम्हाला गोड आणि आंबट चव आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ घालू शकता.