कोणत्याही कामासाठी कारने लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी सीएनजी कार पैसा वसूल कार आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सीएनजीची किंमत 77 रुपये आहे, तर पेट्रोलची किंमत 104 रुपये आहे. आता सीएनजीवर चालणारी कार 30-34 किमी/किलो इंधन मायलेज देते. तर पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे मायलेज 15-20 kmpl आहे. यातच जर तुम्हीही परवडणारी सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्यायांबद्दल सांगणार आहोत…
मारुती अल्टो K10 (CNG)
मायलेज: 33.85 किमी/किलो
Maruti Alto K10 CNG तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमती 5.70 लाख रुपयांपासून सुरू होतात. या कारमध्ये पावरफुल 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 33.85 किमी/किलो मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. या कारमध्ये 5 लोकांसाठी बसण्याची जागा आहे. सुरक्षिततेसाठी कारला EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते.
मारुती एस-प्रेसो (CNG)
मायलेज: 32.73 किमी/किलो
S-Presso ही एक जबरदस्त कार आहे. मात्र याची किंमत आता जास्त असल्याने ग्राहक यापासून दूर जाताना दिसत आहेत. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 32.73km/kg च्या मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. कारमध्ये EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आहे. याची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती वॅगन-आर (सीएनजी)
मायलेज: 34.05 किमी/किलो
जर तुमच्या कुटुंबात जास्त लोक असतील आणि तुम्हाला अशी कार घ्यायची असेल ज्यामध्ये स्पेसची कमतरता नसेल, तर तुमच्यासाठी मारुती वॅगन-आर हा एक चांगला पर्याय ठरू शकते. यात तुम्हाला चांगली स्पेस मिळते. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे, मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार CNG मोडमध्ये 34.43 किमी/किलो मायलेज देते, असं बोललं जात आहे. सुरक्षिततेसाठी कारला EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते. याची किंमत 6.44 लाख रुपयांपासून सुरू होते.