
आपल्या हिंदुस्थानात ध्यानधारणा ही साधना फार पूर्वापार चालत आलेली आहे. ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या आयुष्याला एक वेगळाच आयाम देते. ध्यानाचे परीणाम हे मानवी जीवनासाठी फार उपयुक्त आहेत. म्हणूनच धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात ध्यानधारणा आशेची संजीवनी ठरत आहे. ताण तणाव असलेल्यांसाठी ध्यान हे गेमचेंजर म्हणून ओळखले जाते. ध्यान आपल्याला शांती आणि आनंदाच्या दिशेने मार्गस्थ करते. ध्यानाचे मूळ उद्दिष्ट सकारात्मकता, उत्पादकता आणि प्रगतीचा ध्यास हाच आहे. ध्यानाचा मेंदूवर खूप उत्तम प्रभाव पडतो, कारण ध्यान आपल्याला स्वतःशी संवाद साधण्यास भाग पाडते. श्वासोच्छवासाचे ध्यान, स्थिर ध्यान आणि त्राटक ध्यान यासारख्या ध्यान तंत्रांमुळे मेंदूचा पूर्ण वापर होतो.
ध्यान करण्यामुळे मेंदूत कोणते बदल होतात
ध्यान हे योगाचे एक साधन आहे, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. ध्यान हा एक उत्तम आणि शक्तिशाली उपचार आहे. ध्यानामुळे विचारांना योग्य प्रकारे घडवण्याची पद्धत साध्य होते. तसेच हे विचार आपल्या मनालाही योग्य गतीने मार्ग दाखवतात. ध्यानामुळे उत्पादकता आणि विकासाकडे विचार वळल्याने चैतन्य आणि ऊर्जा वाढीसाठी खूप मदत होते.
Tips to Manage Stress- रोजच्या जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी हे आहेत महत्त्वाचे पर्याय!
ध्यानामुळे डिहायड्रोएपी-अँड्रोस्टेरॉन, कॉर्टिसोल, सेरोटोनिन, मेलाटोनिन आणि एपिनेफ्रिन सारख्या हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटरवर लक्षणीय परिणाम होतो असे मानले जाते. ध्यानाची प्रक्रिया शरीरात एक विराम आणते. यामुळे हृदयाची गती सुधारते, चयापचय कमी होते, रक्तदाब कमी होतो, श्वासोच्छवास आणि मेंदूच्या लहरी सुधारतात.
ध्यानधारणेदरम्यान मेंदूतील सेरोटोनिन कसे वाढते हे दाखवणारे अभ्यास झाले आहेत. सेरोटोनिनला ‘आनंदाचा संप्रेरक’ असेही म्हणतात आणि ते मूड नियमनात महत्त्वाची भूमिका बजावते.
ज्याप्रमाणे शरीराला वेगवेगळ्या अवयवांवर आणि संबंधित स्नायू गटांवर काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मेंदूच्या कार्यांशी संबंधित विशिष्ट परिणामांसाठी वेगवेगळ्या ध्यान तंत्रे आहेत. सुपरपॉवर मेडिटेशन सारखे ध्यान तंत्र हे एक शक्तिशाली तंत्र आहे. ध्यान आपल्या सर्जनशीलतेवर आणि उद्देशावर कार्य करते. दुसरीकडे, श्वासोच्छवासाचा च्या ध्यानासारख्या तंत्रांचा मनावर आणि शरीरावर खूप शांत प्रभाव पडतो.
श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी श्वासोच्छवासाच्या ध्यानाचा वापर केला जातो ज्यामुळे चिंता, ताण, नैराश्य इत्यादी मानसिक त्रास दूर होतात. म्हणूनच, ध्यानामध्ये मेंदूमध्ये विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बदल घडवून आणण्यासाठी विविध तंत्रांचा समावेश असतो.