बीटाचा रस चेहऱ्यावर लावण्याचे आहेत खूप सारे फायदे! वाचा सविस्तर

आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी बीटरूटचा वापर केला जातो. चेहऱ्यासोबत आपण आरोग्यासाठीही बीट आहारात समाविष्ट करतो. हेच बीट आहारात समाविष्ट केल्यास आपण निरोगी ताजे टवटवीत राहतो. मुख्य म्हणजे बीटाचा उपयोग आपण सौंदर्यासाठी सुद्धा करु शकतो. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरतो. याशिवाय, आपण चेहऱ्यावरील दिसणारे डाग लपवण्यासाठी मेकअप देखील करतो. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी आपण हेवी मेकअप देखील करतो. यापेक्षा आपण त्वचेला नैसर्गिक उपाय करणे हे केव्हाही इष्ट.. बीटचा रस हा चेहऱ्यासाठी वरदान मानला जातो. याच बीट रसाचे चेहऱ्यासाठी काय फायदे होतात ते पाहूया.

बीट रसाचे फायदे

बीटाचा रस हा अनेकांना प्यायला आवडतो. अनेकांच्या रुटीनचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. हाच रस आपण चेहऱ्यावरही लावु शकतो. बीट रस चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेला नैसर्गिक तजेला प्राप्त होतो. त्वचा गुलाबी दिसू लागते, तसेच बीटामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला सुरकुत्या देखील येत नाहीत. बीटाचा रस लावल्याने, त्वचा हायड्रेट राहते. डागांची समस्याही कमी होते.

बीटाचा रस दररोज चेहऱ्यावर लावल्यास, ब्लशची गरज भासणार नाही. तसेच त्वचाही कोरडी होणार नाही. पुरळ, काळी वर्तुळे आणि टॅनही दिसणार नाही.

Skin Care Tips- चेहरा सदाबहार तरुण दिसण्यासाठी ‘हा’ फेस मास्क आठवड्यातून किमान एकदा लावा! वाचा सविस्तर

 

बीटाचा रस थेट चेहऱ्यावर लावू शकत नसाल तर, बीटचा रस दही किंवा कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावणे चांगले. हा फेस पॅक लावल्याने तुमची त्वचा चमकदार दिसेल. शिवाय, तुमची त्वचा स्वच्छ होईल.

 

ताज्या काढलेल्या बीटाचा रस चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येईल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)