चोरांनी भजी बनवून खाल्ली अन् पळ काढला

चोराला लंगोटी प्यारी असं म्हणतात. त्याचा प्रत्यय नुकताच आंध्र प्रदेशात आला. चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरांनी घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कमसह तीन सिलिंडर चोरल्याची घटना उघडकीस आली, परंतु चोरीनंतर पळ काढण्याआधी चोरांनी घरात गॅसची शेगडी पेटवून मस्त भजी तयार करून खाल्ली अन् नंतर पळ काढला. घरातील स्वयंपाकघरात सामान पसरलेले पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.