व्यवसाय वृध्दीसाठी ‘दि विमेन्स सर्कल’ व्यासपीठ; महिलांना एकत्र आणणे हे ध्येय

महिला उद्योजिकांची इतर महिला उद्योजिकांसोबत ओळख व्हावी व त्यांना व्यवसाय मिळावा यासाठी रसिका जोशी-फेणे यांनी ‘दि विमेन्स सर्कल’ या व्यासपीठाची सुरुवात केली होती. या व्यासपीठाला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्ताने एका ‘बिझनेस फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला त्यांच्या ब्रँडसाठी ब्लॅक आणि गोल्ड पेहरावात आल्या होत्या. ‘दि विमेन्स सर्कल’च्या प्रमुख वक्त्या टोनिषा पवार यांनी “यशासाठी ड्रेस” या विषयावर मार्गदर्शन केले. या वर्धापन दिनानिमित्त यांनी एक वृत्तपत्रिका सुरू केली. ज्यामध्ये संस्थेच्या सदस्यांचे लेख, त्यांच्या यशोगाथा, प्रेरक कथा असणार आहेत.

अलीकडेच दि विमेन्स सर्कल’ने टीडब्ल्युसी (TWC) या बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते; यावेळी 100 हून अधिक महिला उद्योजक उपस्थित होत्या. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच उद्योगक्षेत्रात स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. उद्योजिका – डॉ.मनिषी किन्ही, निपा भाथेना, सीईओ ऑफ द इयर – शिल्पा रिसबुड, मोनाली गडा, यंग अचिव्हर ऑफ द इयर -चतुरा गौडर, रोमा दफ्तरी, सिमरन मेहता. सोलोप्रेन्युअर ऑफ द इयर – कृतिका गिडवाणी, नियती साफी या उद्योजक महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

‘दि विमेन्स सर्कल’चे महिला उद्योजिकांसाठी असलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने कस्तुरी दवे, नेहा चाफेकर, अनुजा रागणेकर, अर्चना छाब्रिया, डॉ. अपूर्वा सावंत, शिखा अग्रवाल, अशनीत कौर आनंद, विधी संघवी आदींनी परिश्रम घेतले.